सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने चेन्नई (तमिळनाडू) येथील ‘महाराष्ट्र मंडळ, कोईम्बतूर’ येथे प्रवचन !

चेन्नई (तमिळनाडू) – गणेशोत्सवाच्या निमित्ताने येथील ‘महाराष्ट्र मंडळ, कोईम्बतूर’ येथे मराठी बांधवांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘गणेशोत्सवातील अध्यात्मशास्त्र आणि आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयांवर प्रवचन घेण्यात आले. हे प्रवचन सनातन संस्थेच्या साधिका सौ. रश्मी चिमलगी यांनी घेतले. याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. यातील काही जिज्ञासूंनी ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

या वेळी सौ. रश्मी चिमलगी यांनी श्री गणेशचतुर्थी साजरी करण्यामागील महत्त्व आणि गणेशपूजेत वापरण्यात येणार्‍या दूर्वा अन् लाल फूल यांचे महत्त्व, याविषयीची माहिती सांगितली.