हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांचा आदर्श ठेवून प्रत्येकाने श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन होण्यासाठी प्रयत्न करा ! – संपादक

केर्ले (जिल्हा कोल्हापूर), १८ सप्टेंबर (वार्ता.) – ग्रामपंचायत केर्लेच्या वतीने घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या अगोदर एक दिवस म्हणजे १४ सप्टेंबर या दिवशी एका रिक्शाद्वारे ‘श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन न करता त्या ग्रामपंचायतीकडे दान कराव्यात’, असे आवाहन करण्यात येत होते. ही गोष्ट येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ रिक्शा थांबवली. रिक्शाद्वारे उद्घोषणा करणार्या संबंधितास त्यांनी ‘असे पुकारण्याच्या संदर्भात तुमच्याकडे काही लेखी आदेश आहे का?’, अशी विचारणा केली. यावर संबंधित व्यक्ती कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. यानंतर या रिक्शाचालकाने ग्रामपंचायतीत संपर्क केला असता त्यांना ‘उद्घोषणा थांबवा’, असा निरोप मिळाला. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांनी केर्ले ग्रामपंचायतीचा श्री गणेशमूर्ती दानाचा डाव उधळून लावला !
या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री. रामभाऊ मेथे म्हणाले, ‘‘अशा प्रकारे उद्घोषणा चालू असल्याचे माझ्या लक्षात आल्यावर मी त्यांच्याकडे प्रशासनाच्या आदेशाच्या कागदपत्रांची मागणी केल्यावर त्यांच्याकडे तसे काहीच नसल्याचे लक्षात आले. ही उद्घोषणा अशीच चालू ठेवल्यास मी त्यांना फौजदारी गुन्हा नोंद करण्याची चेतावणी दिली. यामुळे रिक्शाचालकाने काढता पाय घेतला. केर्ले गावात भाविक श्री गणेशमूर्ती विसर्जनासच प्राधान्य देतात. त्यामुळे दुसर्या दिवशी केवळ २५ श्री गणेशमूर्ती ग्रामपंचायतीस दान मिळाल्या होत्या. गेली अनेक वर्षे हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही श्री गणेशमूर्ती विर्सजन मोहीम राबवत असून त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत