कम्युनिस्टांचा इतिहास आणि वर्तमान हिंसाचाराचाच आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! – संपादक
गोमती (त्रिपुरा) – गोमती जिल्ह्यातील उदयपूर शहरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटना ‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया’ आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार झाल्याची घटना घडली. या विद्यार्थी संघटनेकडून एका मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या वादातून हिंसाचार झाला. यात भाजपचा एक कार्यकर्ता गंभीररित्या घायाळ झाला, तर विद्यार्थी संघटनेचे २-३ कार्यकर्ते घायाळ झाले.
हिंसाचारानंतर आगरतळा आणि विशालगड येथील माकपच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली. तसेच कार्यालयांना आगही लावण्यात आली. माजी मंत्री रतन भौमिक यांचे एक वाहन पेटवून देण्यात आले. कृषीमंत्री प्रणजीत सिंह रॉय यांनी घटनास्थळी पोचून हिंसाचाराची माहिती घेतली. ‘माकपच्या विद्यार्थी संघटनेने पोलिसांच्या अनुमतीविना मोर्चा काढला’, असा आरोप रॉय यांनी केला.