वैशाली (बिहार) शहरातील हिंदूंच्या ३ मंदिरांतील मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड !

स्थानिक नागरिकांकडून रस्ताबंद आंदोलन !

  • भारतात कधीही मशिदीमध्ये किंवा चर्चमध्ये तोडफोड करण्यात आल्याच्या बातम्या वाचायला मिळत नाहीत; मात्र प्रतिदिन कुठेनाकुठे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याच्या घटना घडत असतात. ही स्थिती रोखण्यासाठी हिंदूंनी जागृत होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करून देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करावे ! – संपादक
  • बिहारमधील सरकारमध्ये भाजप सहभागी असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक

वैशाली (बिहार) – येथील जंदाह कोठी परिसरात हिंदूंच्या प्राचीन शिवमंदिरात घुसून तेथील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. अज्ञातांनी येथील भगवान शिव, श्री महाकालीदेवी, श्री दुर्गादेवी आणि अन्य देवता यांच्या मूर्ती, तसेच शिवलिंग तोडून बाहेर असणार्‍या तलावात फेकून दिले. अशाच प्रकारे शहरातील अन्य २ मंदिरांतही तोडफोड करण्यात आली. या घटनांची माहिती मिळाल्यावर स्थानिक नागरिकांनी रस्ताबंद आंदोलन करून संताप व्यक्त केला. पोलिसांनी ‘आरोपींना लवकरच अटक करू’, असे आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक