पुणे येथे ब्राह्मण महासंघाकडून महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार !

लोकवर्गणीतून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी पायर्‍या बांधण्याची महासंघाची सिद्धता

श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करताना महापौर मुरलीधर मोहोळ आणि ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे 

पुणे, १९ ऑगस्ट – श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीदिनी म्हणजे १८ ऑगस्ट या दिवशी त्यांना अभिवादन केल्यावर महापौरांना येथे पायर्‍यांची आवश्यकता असल्याचे आणि त्यासाठी ब्राह्मण महासंघ प्रयत्नशील आहे, असे महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी निदर्शनास आणून दिले. लोकवर्गणीतून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शनिवारवाडा येथील पुतळ्यासाठी पायर्‍या बांधण्याच्या ब्राह्मण महासंघाच्या प्रस्तावाविषयी तांत्रिक बाजूचा विचार करून निर्णय घेऊ, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, तसेच मोहोळ यांनी तातडीने या कामासाठी महापौर निधीतून १५ लाख रुपये मंजूर केल्याचे पत्र दिले. या तत्परतेविषयी १९ ऑगस्ट या दिवशी महासंघाच्या वतीने महापौरांचा पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला.

याविषयी माहिती देताना आनंद दवे म्हणाले की, पायर्‍यांचा आराखडा करण्याचे काम चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर लगेचच काम चालू करण्यात येणार असून ब्राह्मण महासंघ लोकवर्गणीतून पायर्‍या उभारून त्या महानगरपालिकेला सुपुर्द करणार आहे.