
सातारा, ९ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ७ ऑगस्ट या दिवशी असरार पालकर यांच्यावर अज्ञातांनी चाकूने आक्रमण केल्याची घटना घडली. तहसील कार्यालयातील काम संपवून पालकर हे स्वत:ची दुचाकी घेऊन निघाले होते. त्यांनी ‘हॉर्न’ दिल्यामुळे २ अज्ञात व्यक्तींनी चिडून त्यांच्यावर चाकूने आक्रमण केले. यामध्ये ते घायाळ झाले. (क्षुल्लक कारणावरून आक्रमण होते, यातून लोकांमध्ये संयमाचा अभाव किती प्रमाणात आहे, याचा अंदाज येतो. ही स्थिती अशीच राहिल्यास लोक एकमेकांच्या हत्याही करतील. नैतिकमूल्यांच्या संवर्धनासाठी धर्मशिक्षण देणेच आवश्यक आहे. – संपादक) या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !