कर्णावती (गुजरात) – येत्या ३ वर्षांमध्ये भारतामध्ये अमेरिकेतील रस्त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे असलेले रस्ते पहायला मिळतील, असे विधान केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते. या वेळी गडकरी यांच्या हस्ते बनासकांठा जिल्ह्यातील दिसा शहरात ३.७५ कि.मी. लांबीच्या चौपदरी उड्डाणपुलाचे ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आले.
गडकरी म्हणाले की, देशभरात सध्या रस्तेनिर्मितीचे काम वेगाने चालू आहे. सध्याच्या घडीला भारतात प्रतिदिन ३८ किलोमीटर लांबीचे रस्ते सिद्ध होत आहेत. यापूर्वी रस्ते बांधणीचा वेग दिवसाला २ किलोमीटर इतका होता.