व्यक्तीमधील संयम अल्प होत चालल्याचे उदाहरण ! प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अशा घटनांमधून लक्षात येते.

सातारा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर बसस्थानक परिसरामध्ये पहाटे शहाजी पवार यांनी धारधार शस्त्राने आई सुलाबाई पवार यांची हत्या केली. किरकोळ कारणावरून मुलगा आणि आई यांच्यात वाद झाले होते. त्यातून रागाच्या भरात शहाजी यांनी आईची हत्या केली. नंतर शहाजी हे स्वत: रहिमतपूर पोलीस ठाण्यात उपस्थित झाले आणि हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी शहाजी यांना कह्यात घेतले असून पुढील अन्वेषण चालू आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक गणेश किद्रे यांनी दिली.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !