‘गुरुपौर्णिमा’ म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साधक, धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांना भावानंद देणारे आणि चैतन्याची उधळण करणारे ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव २३ आणि २४ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आले होते.
या महोत्सवांत गुरुपूजन, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संग्रहित मार्गदर्शन, ‘आपत्काळाच्या सिद्धतेसाठी करावयाच्या प्रयत्नांची दिशा !’ या विषयावरील व्हिडिओ, तसेच ‘आपत्काळातील हिंदूंचे रक्षण आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना’ या विषयावर व्याख्यान असे स्वरूप होते. या महोत्सवांना जगभरातील साधक, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
एकूण ११ भाषांमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन !
२३ जुलै या दिवशी मराठी, गुजराती, कन्नड आणि मल्ल्याळम् या भाषांत, तर २४ जुलै या दिवशी हिंदी, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी या भाषांत महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.
- एकूण दर्शकसंख्या : १ लाख २४ सहस्रांहून अधिक
- सनातन आणि समिती यांच्या ‘यूट्यूब चॅनल्स’चे वाढलेले ‘सबस्क्राईबर्स’ (सदस्य संख्या) : २ सहस्र ५०० हून अधिक
- एकूण अभिप्रायांची संख्या : १ सहस्र ४३०
विदेशातील जिज्ञासूंनीही या गुरुपौर्णिमा महोत्सवांचा लाभ घेतला. त्याची राष्ट्रनिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे :
|
या घोर आपत्काळातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील साधक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना घरबसल्या चैतन्यदायी अशा गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ घेता आला. त्याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! |