चोरांना पोलिसांचे भय न राहिल्याचे उदाहरण ! – संपादक

पाटस (पुणे), ५ ऑगस्ट – पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस येथे ३ ऑगस्टच्या मध्यरात्री पोलीस वेशातील ४ चोरांनी एका एस्.टी.ला थांबवून ४ प्रवाशांकडील अनुमाने १ कोटी १२ लाख रुपयांची रक्कम लुटली. प्रवासी हितेंद्र जाधव यांनी पाटस पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस वेशात असणार्या ४ चोरांनी बसमध्ये प्रवेश करत तक्रारदार आणि त्यांच्या प्रवासी साथीदारांना ‘तुम्ही दोन नंबरचा व्यवसाय करत आहात’, असे म्हणत दमदाटी करत बसमधून खाली उतरवले. बस जाताच प्रवाशांना काठीने मारहाण आणि दमदाटी करत त्यांच्याकडील पैसे घेऊन ते दुचाकीवरून निघून गेले.
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !
‘सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये दिसणारी व्यक्ती मीच आहे’, अशी आरोपीची स्वीकृती !
पुणे विभागात धरणातील जलसाठ्यात लक्षणीय तूट !
आजपासून महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशूसंवर्धन विभाग यांच्या वतीने राज्यभरात ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चे आयोजन !