‘संस्कारहीन व्यक्ती शिक्षित समाजात हंसाच्या थव्यामध्ये बगळ्याप्रमाणे असतात.’ जे आई-वडील संस्कारहीन मुलांना समाज आणि देश यांच्या डोक्यावर मारतात, ते निश्चितच पुष्कळ मोठा गुन्हा करतात. ज्या ठिकाणी ज्ञान, शिक्षण, माणुसकी आणि संपन्नता असते, त्या ठिकाणी स्वर्ग असतो. याच्या उलट जेथे अज्ञान, राक्षसीपणा आणि संकटे असतात तेथे नरक असतो. संस्कारक्षम व्यक्ती स्वर्ग निर्माण करतात, तर संस्कारहीन व्यक्ती नरक निर्माण करतात.’ – गीता स्वाध्याय (जानेवारी २०११)