भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की, जिथे बहुसंख्यांक समाजावर अल्पसंख्यांकांकडून अत्याचार होत आहेत. मेवात (हरियाणा) येथील हिंदूंनी धर्मांधांच्या अत्याचारांना कंटाळून पलायन केले. या घटनेवर निवृत्त जनरल मेजर जी.डी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने दिलेल्या अहवालात मेवातमध्ये अनेक ठिकाणी अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांना धर्मांधांकडून त्रास दिला जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर निवृत्त न्यायाधीश पवनकुमार यांच्या समितीने ‘मेवात हे छोटे पाकिस्तान निर्माण होण्याच्या वाटेवर आहे. ही गंभीर गोष्ट आहे’, असे मत अहवालातून व्यक्त केले. यावर तेथील मुख्यमंत्र्यांनी ‘मेवातच्या स्थितीत पालट केला जाईल. धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात कायदा करू’, असे आश्वासन दिले; पण दुर्दैवाने त्यावर आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.