वृद्ध ख्रिस्ती व्यक्तीने २ कोटी रुपये खर्च करून उभारले श्री सिद्धिविनायकाचे मंदिर !

धर्मांध ख्रिस्त्यांकडून विरोध !

ख्रिस्ती गॅब्रिएल नाजेरथ यांनी त्यांच्या मूळ गावी २ कोटी रुपये खर्च करून उभारलेले श्री सिद्धिविनायकाचे मंदिर

मुंबई – मुंबईत रहाणारे ७७ वर्षी ख्रिस्ती गॅब्रिएल नाजेरथ यांनी त्यांच्या मूळ गावी २ कोटी रुपये खर्च करून श्री सिद्धिविनायकाचे मंदिर उभारले आहे. स्वतःच्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ २ कोटी रुपये खर्च करून त्यांनी हे मंदिर बांधले आहे.

वयाच्या १३ व्या वर्षापासून नाजेरथ मुंबईत होते. ते मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराजवळच कामाला होते. ते प्रतिदिन श्री सिद्धिविनायकला मंदिराबाहेरून नमस्कार करत होते. हळूहळू ते श्री सिद्धिविनायकाचे भक्त बनले. काही वर्षांनी त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्यांचा व्यवसाय चांगला चालल्यानंतर वयोवृद्ध झाल्याने त्यांनी त्यांच्या कर्नाटक येथील उडुपी येथील शिरवा गावात जाण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांनी त्यांच्या भूमीवर श्री सिद्धिविनायकाचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचे मित्र सतीश शेट्टी आणि रत्नाकर कुकिया यांना त्यांनी मंदिराचे विश्‍वस्त बनवले. या मंदिरातील मूर्ती मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील मूर्तीप्रमाणेच आहे. नाजेरथ यांचे म्हणणे आहे की, मला जे काही आयुष्यात मिळाले, ते श्री सिद्धिविनायकाच्या कृपेमुळे मिळाले.

ख्रिस्त्यांनी नाजेरथ यांना चर्चमध्ये जाण्यापासून रोखले !

अशा ख्रिस्त्यांमध्ये किती धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव आहे, हे लक्षात येते ! याविषयी पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी बोलत का नाहीत ?

गॅब्रिएल नाजेरथ

सतिश शेट्टी यांनी सांगितले की, नाजरेथ यांनी मंदिर बांधल्याने त्यांना विरोध केला जात आहे. त्यांना चर्चमध्ये जाण्यापासून रोखले जात आहे. नाजेरथ यांनी मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला चर्चच्या पाद्य्रांना आमंत्रित केले होते; मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी मंदिरात येण्याचे आश्‍वासन मात्र दिले आहे.