संभाजीनगर येथे निवृत्त पोलीस फौजदाराची १ लाख ८ सहस्र रुपयांची फसवणूक

संभाजीनगर – पोलीस आयुक्तालयातील निवृत्त साहाय्यक पोलीस फौजदार अमरसिंग चौधरी (वय ६० वर्षे) यांच्या अधिकोष खात्याची अचूक माहिती घेऊन एका भामट्याने ‘ऑनलाईन’ पद्धतीने ३ वेळा मिळून १ लाख ८ सहस्र रुपयांची रक्कम खात्यातून काढून त्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.