
सिंधुदुर्ग – मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथे श्री भवानी मंदिरानजीक १६ मे या दिवशी सकाळी ‘पावलो ट्रॅव्हल्स’ची आराम बस उलटली. या अपघातात महामार्गावरून पायी जाणारे दूध व्यावसायिक मंगेश महादेव सावंत बसखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीतून प्रवास करणारे २ प्रवासी गंभीर घायाळ झाले आहेत, तर अन्य प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जाणारी ही बस ओरोस येथे आली असता मार्गावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन