मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्या अशा कर्मचार्यांना फाशीची शिक्षा करा !

बेंगळुरू (कर्नाटक) – फेरीवाला म्हणून व्यवसाय करणार्या राधम्मा नावाच्या एका महिलेने व्याजासह कर्ज काढून रुग्णवाहिकेला ५ सहस्र आणि स्मशानातील कर्मचार्याला ३ सहस्र देऊन तिच्या मृत कोरोनाबाधिता नातेवाइकावर अंत्यसंस्कार केल्याची घटना यलहंका येथे घडली. शव रुग्णवाहिकेतून यलहंका मेडी येथील स्मशानभूमीत आणण्यात आल्यावर तेथल्या कर्मचार्याने ‘पैसे दिले तरच अंत्यसंस्कार करण्यात येईल’, असे सांगितले. रुग्णवाहिकेच्या चालकानेही अधिक पैशाची मागणी केली. राधम्माने हात जोडून विनंती केली; मात्र त्यांनी ते ऐकले नाही. त्यामुळे राधम्माने माइक्रो फाइनान्स आस्थापनातून व्याजाने कर्ज काढून पैसे दिले.
स्मशानभूमीतील कर्मचार्याने पैसे घेतल्याची ही घटना प्रजा परिवर्तन वेदिकेच्या सदस्यांना समजताच त्या स्थळी त्यांनी काही काळ आंदोलन करून निषेध केला. स्मशान कर्मचारी आणि वेदिका सदस्यांमध्ये या वेळी वादावादी झाली. गरिबांना लुबाडणार्या स्मशानभूमी कर्मचार्यांची ही लूट थांबवण्यासाठी पालिका अधिकार्यांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !