१. पू. (श्रीमती) सुमनमावशी यांचा परात्पर गुरु डॉक्टरांच्या आसंदीप्रतीचा असलेला भाव
‘१०.१.२०१९ या दिवशी मी नामजपासाठी जातांना मार्गिकेत पू. सुमनमावशी भेटल्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘माझ्या साडीवर पाणी सांडल्याने साडी ओली झाली आहे. त्यामुळे मी नामजपादी उपायांना कशी जाणार ? गुरुदेवांच्या आसंदीवर कशी बसणार ? बसल्यास त्यांची आसंदी ओली होईल.’’ यातून मला पू. (श्रीमती) सुमनमावशी यांचा परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रती, तसेच आसंदीप्रतीचा भाव दिसून आला.
२. परेच्छेने वागणे
मी त्यांना एका साधिकेच्या खोलीत घेऊन गेले. त्या वेळी तिथे दोन साधिका होत्या. त्या दोघींनी पू. सुमन मावशींना दोन वेगवेगळ्या रंगाच्या साड्या दिल्या आणि ‘यातील तुम्हाला कुठली आवडेल, ती नेसा’, असे सांगितले, पू. मावशींनी त्या साधिकांना सांगितले, ‘‘माझी आवड-नावड असे काही नाही. मनानुसार नको. तुम्ही जी साडी द्याल, ती मी नेसेन.’’
३. वेळेचे गांभीर्य आणि समष्टी उपायांची तळमळ
त्या साडी नेसत असतांना त्यांच्या मुखामध्ये सतत आता उपायांची वेळ झाली आहे. ‘माझी साडी नेसून होईल का ? मला वेळेत उपायांना जायला पाहिजे’, हा ध्यास दिसून आला. त्यांच्यातील समष्टी नामजपादी उपायांची तळमळ आणि साधकांप्रती असलेला भाव त्यांच्या बोलण्यातून देवाने अनुभवायला दिला.
‘हे देवा, तू आम्हाला संतांच्या माध्यमातून शिकायला देत आहेस. संतांना जवळून पहाण्याची संधीही देत आहेस. त्यांचा सहवास आणि चैतन्य यांतून आनंद देत आहेस. त्याविषयी तुझ्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.