-
कोरोनारूपी आपत्काळासाठी मार्गदर्शक सदर !
-
साधकांसाठी महत्त्वाची सूचना
‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील नामजपादी उपाय होतील, असे साधकांनी पहावे.
१. नामजप
‘सद्य:स्थितीत आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता आणि आध्यात्मिक बळ मिळावे’, यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप (‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय ।’) प्रतिदिन १०८ वेळा करावा. हा नामजप https://www.sanatan.org/mr/helpful_chant_in_corona या संगणकीय मार्गिकेवर उपलब्ध आहे.
१ अ. छातीमध्ये कफ झाल्याचे लक्षात आल्यास किंवा खोकला झाल्यास कफ होऊ नये, यासाठी ‘‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री हनुमते नमः – श्री हनुमते नमः – ॐ नमः शिवाय – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप प्रतिदिन १०८ वेळा करावा
२. स्तोत्रपठण
आपत्काळात रक्षण होण्यासाठी प्रतिदिन सकाळी चंडीकवच (देवीकवच), तर सायंकाळी ‘बगलामुखी दिग्बन्धन स्तोत्र’ ऐकावे. ही स्तोत्रे https://www.sanatan.org/mr/audio-gallery या संगणकीय मार्गिकेवर उपलब्ध आहेत.
३. ‘रक्षायंत्र’ आणि रामकवच धारण करणे
परात्पर गुुरु पांडे महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे प्रतिदिन ‘रक्षायंत्र’ बाळगावे, तसेच रामकवच धारण करावे. रक्षायंत्र आणि रामकवच यांचे धागे, तसेच ताईतमधील रक्षायंत्राची प्रत प्रत्येक २ मासांनी पालटावी. जुने धागे आणि रक्षायंत्राची प्रत अग्नीत विसर्जित करून नवीन धागे अन् प्रत ताईतमध्ये घालावी. रक्षायंत्राचा ताईत पालटण्याची आवश्यकता नाही. रक्षायंत्राची प्रत आणि त्या संदर्भातील सूचना सर्वांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्या https://www.sanatan.org/mr/a/70765.html या संगणकीय मार्गिकेवर ठेवल्या आहेत.
४. प्रति एक घंट्याने उदबत्ती किंवा स्वतःच्या हातांनी सप्तचक्रांवरील आवरण काढणे
प्रति एक घंट्याने सहस्रार ते स्वाधिष्ठान चक्रांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण २ – ३ मिनिटे काढावे. आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांनी उदबत्तीच्या साहाय्याने, तर त्रास नसणार्या साधकांनी स्वतःच्या हातांनी आवरण काढावे. यानंतर ‘भीमसेनी’ कापराचा सुगंध घेऊन उपाय करावेत. ‘माझ्या देहाची शुद्धी होऊन मला उत्साह वाटू दे’, अशी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करावी.
साधकांच्या साधनेत खंड पाडून त्यांना त्रास देण्यासाठी वाईट शक्ती येनकेन प्रकारेण प्रयत्न करत आहेत. संकटकाळात तर हे त्रास अधिकच वाढत असल्याने या काळात सर्वांनी नामजपादी उपाय करणे अनिवार्य आहे.
साधकांनो, सर्वशक्तीमान ईश्वर आपल्यासह असल्याने प्रतिकूल परिस्थितीत डगमगून न जाता स्थिर राहून श्रद्धेने सर्व उपाय करा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२१)
|