भक्तवत्सल आणि भक्तांना सगुण साकार देवाचे दर्शन देणारे श्री स्वामी समर्थ !

१४ एप्रिल २०२१ या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन आहे. यानिमित्ताने…

श्री स्वामी समर्थ

स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याचे अनेक कथांतून आढळते. द्वारकापुरीत त्या वेळी सूरदास नावाचे महान कृष्णभक्त रहात होते. हे सूरदास जन्माने अंध होते. ‘आपणास सगुण साकार असे श्रीकृष्ण दर्शन व्हावे’, अशी त्यांची फार इच्छा होती. स्वामी समर्थ सूरदासांच्या आश्रमात येऊन उभे राहिले. त्यांनी सूरदासांना हाक मारली आणि म्हणाले, ‘‘तू ज्याच्या नावाने हाका मारत आहेस तो मी, बघ इथं तुझ्या दारात येऊन उभा आहे. सूरदास, पहा जरा.’’ इतके बोलून समर्थांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांना हस्तस्पर्श केला. त्या क्षणाला सूरदासांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना शंख, चक्र, गदाधारी असे श्रीकृष्णाचे सगुण रूप दिसू लागले. सूरदास सद्गदित झाले. थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्यांना स्वामी समर्थांनी आपले वास्तव रूपाचे दर्शन घडवले. सूरदास भारावून गेले आणि स्वामी समर्थांना म्हणाले, ‘‘मला दिव्यदृष्टी दिलीत. आता मला जन्म-मरणाच्या या तापापासूनमुक्त करा !’’ स्वामी समर्थांनी सूरदासांना ‘तू ब्रह्मज्ञानी होशील !’, असा आशीर्वाद दिला.

(संदर्भ : ‘बालसंस्कार’ संकेतस्थळ)