छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्य स्थापनेमागील हेतू

१. हिंदवी स्वराज्य स्थापन करणे

छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू हिंदवी स्वराज्य स्थापनेचा होता. तत्पूर्वी शेकडो वर्षे दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानात मुसलमानी राजवटींनी हैदोस घातला होता. समर्थ रामदास स्वामींनी या परिस्थितीचे वर्णन करतांना ‘म्लेंछ दुर्जन उदंड । बहुता दिसांचे माजले बंड।’, असे म्हटले आहे. हे परकियांचे आक्रमण उघड-उघड धर्मांध होते.

२. केवळ ‘हिंदु’ असल्याने हिंदूंचा छळ करणारी मोगलांची सत्ता हिंदुस्थानातून उखडून टाकणे

आदिलशाही, कुतुबशाही, बिदरशाही, निजामशाही या दक्षिणेकडील मुसलमानी राजसत्ता आणि उत्तरेकडील मदोन्मत्त मोगलशाही हे सर्व जण हिंदूंचा ते केवळ हिंदू आहेत; म्हणून छळ करत होते. ‘ही मोगलांची सत्ताच हिंदुस्थानातून उखडून लावली पाहिजे’, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू होता.

‘श्रीं’चे राज्य म्हणजे ईश्‍वरी राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन करणे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू असल्याने वरील दोन्ही गोष्टी करणे आवश्यक होते.