काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमण !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद हा आतंकवाद्यांना ठार करून संपणार नाही, तर त्यांची निर्मिती करणार्या पाकला नष्ट केल्यावरच तो संपेल !
सोपोर (जम्मू-काश्मीर) – सोपोर नगरपालिकेच्या कार्यालयात चालू असलेल्या नगरसेवकांच्या बैठकीच्या वेळी जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात नगराध्यक्षा फरीदा खान घायाळ झाल्या. आक्रमणात १ नगरसेवक आणि १ पोलीस ठार झाले, तसेच १ पोलीस घायाळ झाला आहे. यानंतर लगेचच सुरक्षादलांनी परिसरात नाकेबंदी करून आतंकवाद्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. हे आक्रमण कोणत्या आतंकवादी संघटनेने आणि किती आतंकवाद्यांनी केले, हे स्पष्ट झालेले नाही. आक्रमणानंतर आतंकवादी पळून गेले.