१. आदीयुगात अलंकारांची अनावश्यकता
‘आदीयुगामध्ये स्त्री ही अलंकारविरहित अवस्थेत पातिव्रत्याचे आणि तद्नंतर येणार्या वैराग्यभावाचे तंतोतंत पालन करणारी असल्याने तिला अलंकारधारणेतून निर्माण होणार्या नैतिकतेस्वरूप संस्कारबंधनांची आवश्यकता भासली नाही.
२. कलियुगात अलंकारांची आवश्यकता
आता काळ पालटला, तसे सृष्टीचे प्रकृतीस्वरूपी नियमांचे रूपही पालटले. स्त्रीला अलंकाररूपी संस्कारबंधनांची आवश्यकता भासू लागली. सृष्टीचे प्रकृतीस्वरूपी नियमांचे रूप पालटण्याचा एक भाग म्हणजे पतीच्या निधनानंतर स्त्रीमध्ये आचारयुक्त वैराग्यधारणेचे संवर्धन करणारी संकल्पना, म्हणजेच विधवांना अलंकार घालणे निषिद्ध असणे.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.१.२००८)
(आदीयुगातील स्त्रियांची सात्त्विकता कलियुगातील स्त्रियांच्या सात्त्विकतेच्या तुलनेत फार जास्त होती. त्या काळी स्त्रिया सात्त्विकतेला धरूनच अलंकार घालत असत.‘नैतिकतेस्वरूप संस्कारबंधन’ हा अलंकारधारणेमागील उद्देश नव्हता. अशा अर्थाने वर आदीयुगात स्त्रियांना अलंकारांची आवश्यकता नव्हती, असे म्हटले आहे. – संकलक)