शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका
|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी कुराणामधील २६ आयते हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘यांतील काही आयते आतंकवादाला प्रोत्साहन देणारी आहेत’, असे या याचिकेत म्हटले आहे.
Ex-Chairman of the Shia Waqf Board files a petition in SC seeking removal of 26 verses of the Quran saying they ‘promote terrorism and jihad’https://t.co/52ZDNHEppK
— OpIndia.com (@OpIndia_com) March 12, 2021
वसीम रिजवी के खिलाफ आक्रोश, जारी हुआ फतवा, सिर कलम कर लाने वाले को मिलेगा 11 लाख का इनाम#WasimRizvi #Quran @Uppolice https://t.co/Lf4X2VtRtA
— Newsroom Post (@NewsroomPostCom) March 13, 2021
या याचिकेमुळे मुसलमानांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. ‘शियाने हैदर-ए कर्रार वेलफेयर असोसिएशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हसनैन जाफरी डंपी यांनी वसीम रिझवी यांचा शिरच्छेद करून त्यांना शिर आणून देणार्यास २० सहस्र रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. तसेच रिझवी यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. ‘जे त्यांच्याशी संपर्क ठेवतील, त्यांना घरी बोलावतील त्यांच्यावरही बहिष्कार घालण्यात येईल’, असे त्यांनी म्हटले आहे.