साधकांना सूचना !
सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ‘ए ४’ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.
१. ग्रंथसूची प्रकार १
ही सूची केवळ मराठी भाषेतील ग्रंथांची आहे. यामध्ये ग्रंथांच्या नावापुढे केवळ पृष्ठसंख्या आणि मूल्य दिले आहे.
२. ग्रंथसूची प्रकार २
ही सूची मराठीसह अन्य सर्व भाषांतील ग्रंथांची आहे. या सूचीमध्ये ग्रंथ कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहेत, हे देण्यात आले आहे.
या सर्व सूची नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. साधकांनी दळणवळण बंदीचे सर्व नियम पाळून सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार योग्य प्रकारची सूची अधिकाधिक उपयोगात आणून धर्मशिक्षण देणारे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने समाजात पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुकृपा
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांना सूचना : काल अमावास्या झाली.
साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,०९३ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.७.२०२६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !