बेंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये दरोडा

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा !

सोलापूर – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी बेंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेस रेल्वे गाडीत १ मार्चला पहाटे दरोडा पडला. या दरोड्यात चोरट्यांनी प्रवाशांना मारहाण करून त्यांचे ५० तोळ्यांचे दागिने लुटले आहेत. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बोरोटी-नागणसूर परिसरात घडली असून सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.