२८ फेब्रुवारी २०२१ या दिवशी ‘राष्ट्रीय विज्ञानदिन’ आहे. या निमित्ताने…
पूर्वीच जे व्यासांनी सांगितले होते, ते वैज्ञानिकांनी आता सांगणे !
सूर्याच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी असणे
महाभारत युद्ध चालू असतांना सूर्यग्रहण होते. त्याचे वर्णन महर्षि व्यासांनी अशा शब्दांत केले आहे, ‘द्विधाभूत इवआदित्यः ।’ याचा अर्थ सूर्य उगवताच दोन भागांचा झाला. पुढे व्यास म्हणतात, सूर्य नेहमीप्रमाणे किरण फेकण्याऐवजी प्रदीप्त ज्वाला बाहेर ओकू लागला. आता आधुनिक विज्ञानाने सूर्याच्या पृष्ठभागावर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे मागे दूरचित्रवाणीवर दाखवले होते. त्यामुळे व्यासांनी सत्य सांगितले होते, हेच खरे !
१. गॅलिलिओच्या सहस्रो वर्षे आधी लिहिलेल्या ऋग्वेदात सूर्यावरच्या डागाचे वर्णन आहे.
२. आकाशगंगा गोल आहे, हे विज्ञानाला आता कळलेले ज्ञान वेदकाळात हिंदूंना होते. आकाशगंगा मूलभूत असून त्यातून हे जग बनले आहे आणि आपले जग तिच्यावरच आधारलेले आहे, हे ज्ञान वेदकाळी होते.
ग्रह
सर्व ग्रह प्राथमिक अवस्थेत तप्त स्वरूपात असून कालांतराने थंड झाले, याचा उल्लेख ऋग्वेदात आहे. त्याचा आधुनिक विज्ञानाने आता शोध लावला.
नक्षत्र
अगणित तारकांपैकी केवळ अभिजित नक्षत्र तेवढेच इ.स. पूर्व १२ सहस्र वर्षे या काळी ढळले, हे आजच्या विज्ञानाला कळलेले ज्ञान सहस्रो वर्षांपूर्वी व्यासांनी महाभारतात सांगितलेले होते.आधुनिक शास्त्रज्ञांनी आता मान्य केले की, त्या वेळी वेगा (म्हणजे अभिजित नक्षत्र) खरोखरीच ढळले होते आणि हा तारा उत्तर ध्रुव बनला होता.
(संदर्भ : वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृ. २५; लेखक – डॉ. पद्माकर विष्णु वर्तक)
भास्कराचार्य : न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे !
भास्कराचार्य (इ.स. १२ वे शतक) यांनी आपल्या ‘सिद्धांतशिरोमणी’ या ग्रंथात गुरुत्वाकर्षणाविषयी सांगितले आहे.
आकृष्टिशक्तिश्च मही तया यत् खस्थं गुरु स्वभिमुखं स्वशक्त्या ।
आकृष्यते तत् पततीव भाति समे समन्तात् क्व पतत्यंय खे ॥
– सिद्धांतशिरोमणी, भुवनकोश ६
अर्थ : ही पृथ्वी तिच्या आकाशातील पदार्थ स्वतःच्या शक्तीने आपल्याकडे खेचून घेते. त्यामुळे आकाशातील पदार्थ पृथ्वीवर पडतो; परंतु ग्रहमंडलामध्ये सर्वच जण एकमेकांना खेचत असल्याने कुणीही खाली पडत नाही.
भास्कराचार्यांचे पिता विश्वंभरभट्ट यांच्या जीवनात असाच प्रसंग आला होता. सातही व्याहृतींशी अनुसंधान करणारा कोन अवकाशात सिद्ध होत असतांना जर स्त्रीला गर्भधारणा झाली, तर जन्माला येणार्या मुलांना सात व्याहृतींचा भेद घ्यायचे शास्त्र कळेल, हे विश्वंभरभट्टांना कळले होते. त्यातून भट्ट भास्कर जन्माला आला. भास्कराचार्य यांचा जन्म ५ व्या शतकात झाला. ते वैदिक ज्योतिषातील तज्ञ होते. गणित अपूर्ण शास्त्र असल्याचे लक्षात आल्यावर भास्कराचार्यांनी यौगिक गणित लिहिले. त्यांनी यौगिक गणित (कालवाचक गणित – वेदातील शब्द) लिहिले. नवीन ग्रहावर गेल्यासच माणसाला ते कळेल.