२३.७.२०२० या दिवशी पू. गुरुनाथ दाभोलकर साधकांसमवेत नामजप करणार आहेत, असे समजल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनाच साधकांचे नामजपादी उपाय पूर्ण व्हावेत, अशी तळमळ आहे, असे मला (सौ. मनीषा परब यांना) जाणवले. या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
सौ. मनीषा दीपक परब, सनातन आश्रम, पनवेल
१. नामजप करण्याचा पहिला दिवस
अ. पहिल्याच दिवशी सायंकाळी मी नामजप करण्यासाठी गेले असतांना पू. दाभोलकरकाका खोलीत प्रवेश करत असतांना परात्पर गुरुमाऊलीच प्रवेश करत आहे, असे मला जाणवले.
आ. त्यानंतर मी प्रार्थना करून नामजप करू लागले. त्या वेळी मी पू. दाभोलकरकाकांकडे पाहिले असता मला त्यांच्या ठिकाणी शिवपिंडीचे दर्शन झाले. असे २-३ वेळा झाले. तेव्हा परात्पर गुरुमाऊली मी तत्त्वरूपाने सर्वत्र आहे, असे मला सांगत असल्याचे जाणवले.
इ. मी परात्पर गुरुमाऊलींचे चरण घट्ट धरूया, असा विचार करून सूक्ष्मातून त्यांचे चरण धरल्यावर मला त्या ठिकाणी बाणलिंग दिसत होते. त्या बाणलिंगाला घट्ट पकडून मी परात्पर गुरुमाऊलींच्या चरणी संपूर्णपणे शरणागत झाले होते.
२. २४ आणि २५.७.२०२० या दिवशी दोन्ही सत्रांच्या वेळी नामजप करतांना मला शिवाची पिंडी दिसत होती. पू. दाभोलकरकाकांच्या देहातून चैतन्यलहरी प्रक्षेपित होत आहेत, असे मला जाणवले.
३. २६.७.२०२० या दिवशी सकाळी नामजप करतांना मी पू. दाभोलकरकाकांकडे पाहिले असता त्यांच्या संपूर्ण देहातून ॐचे प्रक्षेपण होत आहे, असे मला दिसले.
श्री. राजेंद्र सांभारे, सनातन आश्रम, पनवेल
१. पू. काकांच्या कपाळावर बेलाचे पान दिसून त्यातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे, असे मला जाणवले.
२. त्यांच्या भोवती मला पांढर्या रंगाच्या प्रकाश किरणांची प्रभावळ जाणवली.
३. पू. दाभोलकरकाकांच्या अनाहतचक्रातून शांतीच्या वलयांकित चैतन्य लहरी प्रक्षेपित होऊन माझ्यावर उपाय होत आहेत, असे जाणवले.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |