गुरुनामाचे स्मरण करूनी आले भावाश्रू ।
गुरुप्रेमाचा वर्षाव करत आले भावाश्रू ॥ १ ॥
गुरुभेटीची ओढ घेऊनी आले भावाश्रू ।
गुरुमायेची ऊब घेऊनी आले भावाश्रू ॥ २ ॥
गुरुकार्याचा ध्यास घेऊनी आले भावाश्रू ।
गुरुकृपेची सावली बनूनी आले भावाश्रू ॥ ३ ॥
गुरुसेवेतील आनंद घेऊनी आले भावाश्रू ।
गुरुचरण ते चित्ती ठासून आले भावाश्रू ॥ ४ ॥
वर्षू देत भावाश्रूंच्या सरी ।
चिंब भिजू दे तन-मन सारे ॥
धुऊनी जाऊ दे स्वभावदोष अन् अहंकार ।
पावन व्हावे हृदयमंदिर ॥ ५ ॥
गुरुचरणी नतमस्तक मी, जोडूनी दोन्ही कर ।
कृतज्ञतेने भरले मम अंतःकरण ॥ ६ ॥
– श्री. प्रवीण देसाई, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१२.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |