
ठाणे, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – मीरारोड येथील रामनगर परिसरात ७ फेब्रुवारीच्या रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. येथील मोकळ्या मैदानात भारत गॅस आणि एच्पी गॅस यांचे सिलेंडर भरलेले २ ट्रक उभे होते. यातील एका ट्रकमध्ये स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच मीरा-भाईंदर अग्नीशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. सिलेंडर फुटण्याचा आवाज ५ किलोमीटरपर्यंत ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले. सुदैवाने ही घटना मोकळ्या मैदानात घडल्याने मोठी हानी टळली. आग विझवतांना एका जवानाला किरकोळ दुखापत झाली. ट्रकमधील ९५ टक्के सिलेंडर वाचवण्यात मीरा-भाईंदर अग्नीशमन दलाला यश आले.
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !