
अक्कलकोट – मी आणि माझे कुटुंबीय स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. यामुळे माझ्या जीवनाच्या वाटचालीत कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ करतांना स्वामी समर्थांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन अकलूज येथील जनसेवा संघटनेचे अध्यक्ष धवलसिंंह मोहिते-पाटील यांनी केले
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. या वेळी अकलूजचे ग्रामपंचायत सदस्य मयूर माने, जनसेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पालकर, जनसेवा संघटनेचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष नितीन मोरे, सरचिटणीस सुधीर रास्ते, सोलापूर शहर जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अविराज शिंदे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, श्रीशैल गवंडी आदी मान्यवर उपस्थित होते.
मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन सत्कार केला.
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !