दारी आला ‘कोरोना’ महामारीरूपी आपत्काळ ।
परि साधनेसाठी असे हाच संधीकाळ ॥ १ ॥
भावी आपत्काळाची गुरूंनी पूर्वीच दिली होती कल्पना ।
आता साधकांची होत आहे घरबसल्याही साधना ॥ २ ॥
जनता वैफल्यग्रस्त झाली सारी ।
काम ना धंदा बसलेत सर्व जण घरी ॥ ३ ॥
उपाशी, भिकारी, रंक आणि राव ।
म्हणती सारे आता, देवा, तू मला पाव ॥ ४ ॥
धाडिले साधक तव द्वारी संपतकाले ।
घेऊनी ‘सनातन प्रभात’ अन् सात्त्विक उत्पादने ॥ ५ ॥
आताही उद्धरण्या अखिल मानवजाती ।
नामजप सत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद आदी ।
‘ऑनलाईन सत्संगां’चीही करती निर्मिती ॥ ६ ॥
ऊठ वेड्या मानवा, जागा हो सत्वर ।
अमूल्य संधीचा आहे हा अवसर ॥ ७ ॥
‘ऑनलाईन सत्संग’ बघण्यास ।
‘फेसबूक’ वा ‘यू ट्यूब’ वापर ॥ ८ ॥
– श्री. राजेश कोरगावकर, म्हापसा, गोवा. (१५.७.२०२०)