पुणे – दुर्गदुर्गेश्वर रायगडावर जाण्यासाठी पुरातत्व खात्याने माणसी २५ रुपये आकारले जात होते. प्रत्यक्षात गडावर कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देता अशी आकारणी अन्यायकारक असून याचा निषेध म्हणून काही शिवप्रेमींनी ते तिकीटघर उलथवून टाकले. गडाचे संवर्धन चालू असले, तरी गडावर कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. रायगडवाडीकडे उतरणार्या खिंडीत चित दरवाजाचा पायरी मार्गाची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली असून या ठिकाणीच हे तिकीट घर उभारण्यात आले होते. महाडचे आमदार भरत गोगावले या वेळी उपस्थित होते.