आज पोंबुर्फा येथे श्री सत्यनारायण पूजा (तळ्यातील पूजा) !

गोळणा, पोंबुर्फा येथील प्रसिद्ध श्री सत्यनारायणाची पूजा ही ‘तळ्यातील पूजा’ म्हणून प्रसिद्ध आहे. पूजेची पार्श्‍वभूमी सुमारे १०९ वर्षांपूर्वीं गावातील गुराख्यांनी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा मानस व्यक्त केला. पूर्वी येथे मांडव घालून पूजा होत असे. नंतर या जागेवर छोटेखानी घुमटी बांधून पूजा होत होती. आता या जागेवर सुबक देऊळ बांधण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी मालिनी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी ही पूजा होत असते. यंदा ही पूजा शुक्रवार, २९ जानेवारी २०२१ या दिवशी होत आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, पुराण वाचन, आरत्या, गार्‍हाणेे, तीर्थप्रसाद आणि दुपारी महाप्रसाद असेल. यंदा या पूजेचा मान श्री. हनुमंत डोंगरेकर यांना लाभला आहे. तरी भाविकांनी या पूजनोत्सवास आणि इतर कार्यक्रमांस उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.