सातारा, १२ जानेवारी (वार्ता.) – सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली. त्यामुळे बहुसंख्य महिलांना अनेक क्षेत्रांत स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले; परंतु याच समवेत महिलांनी स्वरक्षणासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस उपअधीक्षक आँचल दलाल यांनी केले.
येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जन्मसप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या उच्चशिक्षण विभागाच्या सहसचिव आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.(सौ.) प्रतिभा गायकवाड होत्या.