पणजी, १५ डिसेंबर (वार्ता.) – रायबंदर येथे जुन्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर असलेला धक्का व्यावसायिक स्तरावर वापरण्यास दिला जाणार नाही, असे आश्वासन बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी दिले आहे. पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी रायबंदर येथील धक्का व्यावसायिक स्तरावर वापरण्यास विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मायकल लोबो यांनी हे आश्वासन दिले.
ते पुढे म्हणाले, ‘‘रायबंदर येथील धक्का एखाद्या खासगी कंत्राटदराला वापरण्यास अनुमती दिलेली असल्यास ती ‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’ मागे घेईल. रायबंदर येथील धक्का जलवाहतूक खात्याच्या अखत्यारित येतो आणि हा धक्का वापरण्यास ‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’ने अनुमती दिलेली नाही.’’