नितीन राऊत यांनी वीजदेयकात सवलतीची घोषणा करतांना केलेली घाई ही आमची चूक ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

संवंग लोकप्रियतेसाठी घोषणा देणारे मंत्री राज्याचे हित कसे साधणार ?

अशोक चव्हाण

मुंबई – ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजदेयकात सवलत देण्याची घोषणा करतांना घाई केली. पक्ष आणि शासन यांमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी. ही आमच्याकडून चूक झाली, अशी स्वीकृती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. नितीन राऊत यांनी सवलत देण्याची घोषणा केली होती. आता मात्र पैशाचे सोंग घेता येत नाही. वीजदेयकामध्ये सवलत देण्याचा विषय राज्यशासनाच्या अखत्यारित आहे, अशी भूमिका नितीन राऊत यांनी घेतली. मनसेच्या वतीने या सूत्रावरून २६ नोव्हेंबर या दिवशी राज्यव्यापी आंदोलन केले. यावरून अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली.