१. भारतातून तस्करी झालेल्या गायींची बांगलादेशात अधिक मूल्याने विक्री
‘मुंसिफ’ या उर्दू दैनिकात १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भारतातून बांगलादेशात प्रतिवर्षी २ लाख गायींची तस्करी केली जाते. ‘इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स’नुसार भारतीय तस्कर प्रत्येक गायीच्या मूल्यातून सरासरी ५ सहस्र रुपये तस्करांकडून वसूल करतात. या तस्करी केलेल्या गायींची बांगलादेशात २६ ते ३५ सहस्र रुपयांत विक्री केली जाते. भारतातून तस्करी करून आणण्यात आलेल्या गायींचे मांस बांगलादेश इतर देशांना निर्यात करतो.
२. तस्करांनी तस्करीसाठी अवलंबलेली क्लृप्ती
भारतीय गायींची बांगलादेशात तस्करी होत असल्यामुळे तेथील जनतेला गोमांस स्वस्त दरात मिळते आणि त्यामुळे ते गोमांस निर्यातही करतात. आता बांगलादेशी आणि भारतीय तस्करांनी गायींच्या तस्करीची एक नवीन क्लृप्ती शोधून काढली आहे. भारतीय तस्कर उत्तर भारतातील गायींची तस्करी करून त्यांना बंगालमध्ये घेऊन जातात, तेथे दुसर्या बाजूने आलेले बांगलादेशी तस्कर गायींना चारा दाखवून पकडतात आणि नंतर त्यांची हत्या करतात.
– डॉ. कुलदीप चंद अग्निहोत्री
(संदर्भ : ‘गौरव घोष’, नोव्हेंबर-डिसेंबर २०१४)
(भारतीय गायींची होणारी तस्करी रोखण्यासाठी देशभरात गोवंश हत्या बंदी कायदा आणि त्याची प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची अपेक्षा ! – संपादक)