पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात भाजीपाल्याचे मूल्य कडाडल्याचे चित्र आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दोन ते अडीच पट भाववाढ करून भाज्यांची विक्री होत आहे. एरव्ही २०-२५ रुपयांना १ किलो मिळणारे बटाटे ५० रुपये, १ किलो वांगी १२० रुपये, भेंडी १६० रुपये प्रतिकिलो अशा चढ्या दराने विक्री होत आहे. नाईलाजास्तव नागरिकांना चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड पडत आहे. प्रशासनाने लक्ष घालून भाजीपाल्याचे मूल्य नियंत्रित ठेवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.