
पुणे – ६ वर्षे खंड पडल्यानंतर ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे (मसापचे) मुखपत्र असलेली ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ मुद्रित स्वरूपात प्रकाशित करण्यात आली. जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून २०२६ असा हा जोडअंक आहे. वर्ष २०२० पासून महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे प्रकाशन खंडित झाले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेत सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य पत्रिका मुद्रित स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. आता ती प्रत्यक्षात आली आहे.
महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा औपचारिक प्रकाशन सोहळा महाराष्ट्र्र साहित्य परिषदेत झाला. महाराष्ट्र्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, प्रसाद मिरासदार, डॉ. आशुतोष जावडेकर आणि पत्रिकेचे संपादक माधव राजगुरु यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झाले. वाचक आणि आजीवन सभासदांना भविष्यात हा अंक सशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे योगेश सोमण यांनी सांगितले.
१९ व्या शतकात अनेक नियतकालिके चालू झाली; मात्र मोजकीच नियतकालिके काळाच्या कसोटीवर टिकली. अशा मोजक्या नियतकालिकांपैकी महाराष्ट्र साहित्य पत्रिका ही एक संशोधन पत्रिका आहे. भविष्यात ‘ई-मेल’वर, पी.डी.एफ्. आणि मुद्रित स्वरूपात ही पत्रिका सशुल्क उपलब्ध करून देण्याचा मसापचा विचार आहे, असे माधव राजगुरु यांनी सांगितले.
भूस्खलनामुळे सांबरवाडी (सातारा) येथे मुख्य जलवाहिनीला तडे !
राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा न करता विरोधकांकडून शिव्याशाप आणि खोटे आरोप ! – एकनाथ शिंदे
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !
मोशी (पुणे) येथील कचरा डेपो दुर्घटनेतील बचावकार्य चालूच !
अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी गृहविभागासह २० शासकीय विभाग एकत्रित काम करणार ! – मुख्यमंत्री
कोयना धरणात ५० टी.एम्.सी. पाणीसाठा !