रायगडमध्ये पुरात ३ सहस्र गॅस सिलिंडर वाहून गेले !

पुरात वाहून चालेले गॅस सिलिंडर

रायगड – पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ३ सहस्र गॅस सिलिंडर वाहून गेले. परिसरातील गोदाम आणि साठवण केंद्रांमध्ये हे सिलिंडर होते. काही सिलिंडर भरलेले, तर काही रिकामे होते.

ज्यांना हे सिलिंडर सापडतील, त्यांनी ते स्वतः वापरण्याचा किंवा हलवण्याचा प्रयत्न करू नये. सिलिंडर तात्काळ हिंदुस्थान पेट्रोलियम प्रशासनाकडे जमा करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.