पुणे – कर्जत लोणावळा रेल्वे मार्गादरम्यान दरड कोसळल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या रहित कराव्या लागल्या, तर काही रेल्वेगाड्या अर्ध्या मार्गावरून परतवण्यात आल्या. अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात पालट केला. त्यामुळे प्रवास रहित झालेल्या ८० सहस्र प्रवाशांना मध्य रेल्वेने ५ कोटी ९१ लाख रुपयांचा परतावा तातडीने दिला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा परतावा मिळालेल्या प्रवाशांच्या संख्येत ४१ सहस्र ६० जणांची वाढ झाली आहे.
मुंबई विभागात ३७ सहस्र ३३० प्रवाशांना २ कोटी ८६ लाख रुपये, पुणे विभागात २० सहस्र ९८२ प्रवाशांना १ कोटी ५६ लाख रुपये परतावा दिला आहे. परताव्याची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी स्थानकावर अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत, तसेच प्रवाशांच्या तक्रारी आणि परताव्याच्या अर्जावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी विशेष मदत कक्ष चालू केला आहे.

इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्र वाचनाचे विद्यार्थ्यांना आवाहन : मातृभाषाप्रेमींमध्ये संताप
कांदोळी येथील किनारी नियमन क्षेत्राचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अभिनेता सलमान खान यांना न्यायालयाची नोटीस
शासकीय कर्तव्यात हयगय केल्यावरून २ अधिकार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
मुरगाव येथील श्री दामोदर सप्ताहाच्या फेरीमध्ये होणार्या हिंदुविरोधी कृत्यांवर बंदी आणा !
तज्ञांचे मत जाणून घेऊ ! – सौ. अश्विनी भिडे, आयुक्त, मुंबई महापालिका
शहापूरचा प्रस्तावित कल्याण अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करा !