गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील संतापजनक घटना !
आरोपीसह मुसलमान कुटुंब गावातून पसार !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील मुरादनगर पोलीस ठाण्याच्या सीमेतील एका गावात मुसलमान तरुणाने ९ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. आरोपीसह मुसलमान कुटुंब गावातून पसार झाले आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेले ग्रामस्थ आणि हिंदु संघटना यांनी पोलीस ठाण्यात जाऊन निषेध व्यक्त केला. त्यांनी आरोपीचे ‘एन्काउंटर’ (पोलीस चकमकीत ठार मारणे) करण्याची आणि त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी केली आहे.
Ghaziabad Shocker : Muslim youth kidnaps and sexually assaults a 9 year old Hindu girl
Accused and his family flee their village
The absence of the harshest punishment only emboldens Love Jihadis to openly commit such crimes.
A shameful failure of the Government.#CrimeNews… pic.twitter.com/uoQ7FwYuaB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 4, 2026
१. ही घटना २ जुलै या दिवशी घडली. इयत्ता ३ रीत शिकणारी ही मुलगी तिच्या घराबाहेर खेळत होती. त्याच वेळी शेजारी रहाणार्या मुसलमान आरोपीने तिला फूस लावून स्वतःच्या घरी नेले. तिथे त्याने मुलीवर बलात्कार केला.
२. बराच वेळ मुलगी न सापडल्याने कुटुंबियांनी तिचा शोध चालू केला. उशिरा रात्री ही मुलगी शेजार्याच्या घरात बेशुद्ध आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. पीडित मुलीचे कुटुंबीय त्यांच्या मुलीला वाचवण्यासाठी तिथे पोचले, तेव्हा आरोपीच्या कुटुंबाने त्यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपीच्या कुटुंबाने गावातून पळ काढला.
३. पोलिसांनी पसार आरोपी आणि त्याचे कुटुंब यांचा शोध घेण्यासाठी ४ पथके सिद्ध केली आहे. या पथकांनी आरोपींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी धाडी घालणे चालू केले आहे.
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court