
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)
सोलापूर – राज्यातील मदरसे आणि मशिदी यांमध्ये कार्यरत असलेल्या परप्रांतीय मौलानांची सखोल चौकशी करून आवश्यक त्या प्रकरणांत त्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी ‘एकता बहुउद्देशीय संस्थे’चे मौलाना अताऊल्ला पटेल यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडे केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलतांना मौलाना अताऊल्ला पटेल यांनी उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश आणि बंगाल आदी राज्यांतून महाराष्ट्रात आलेले काही मौलाना मदरसे आणि मशिदी यांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. (ही माहिती पोलीस प्रशासनाकडे नाही का ? अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
या परप्रांतीय मौलानांच्या नियुक्तीची प्रक्रिया, कार्यपद्धती आणि पार्श्वभूमीची सखोल पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. काही ठिकाणी समाजात तेढ निर्माण करणे, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे, तसेच विद्यार्थ्यांच्या शोषणाच्या घटना घडत असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मदरसे आणि मशिदी यांमध्ये कार्यरत परप्रांतीय मौलानांची चौकशी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर