काश्मीरमध्ये उष्णता वाढूनही शाळेला सुटी न दिल्याने १२ वर्षांच्या विद्यार्थ्याची शिक्षणमंत्र्यांवर टीका

श्रीनगर (काश्मीर) – उष्णता वाढूनही शाळेला सुटी न दिल्याने येथील १२ वर्षांच्या एका शालेय विद्यार्थ्याने शिक्षणमंत्री सकीना इटू यांच्यावर ‘कदाचित् मंत्र्यांची स्वतःची मुले शाळेत जात नसतील आणि त्या स्वतः पूर्ण दिवस ‘एसी’मध्ये झोपून रहातात’, अशा शब्दांत टीका केली. या विद्यार्थ्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. काश्मीर खोर्यातील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असल्याने उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या या विद्यार्थ्याने ही टीका केली.
व्हिडिओ सर्वप्रथम प्रसारित करणार्या वृत्तसंस्थेला नोटीस !
शासकीय ‘बाल कल्याण समिती’ने या प्रकरणाची तात्काळ नोंद घेत संबंधित व्हिडिओ सर्वप्रथम प्रसारित करणार्या वृत्तसंस्थेला नोटीस बजावली आहे. तसेच पोलिसांना व्हिडिओ हटवून ही मुलाखत घेणार्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे. पालकांची किंवा शाळा प्रशासनाची संमती न घेता अल्पवयीन मुलाची मुलाखत घेऊन ती प्रसारित करणे नियमबाह्य असल्याचे समितीने म्हटले आहे.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !