‘एल् निनो’मुळे राज्यात पावसाची कमतरता झाल्याचे प्रकरण
(जेव्हा मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे पाणी सामान्यापेक्षा अधिक गरम होते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल् निनो’, असे म्हणतात.)

पणजी, १४ जून (वार्ता.) – ‘एल् निनो’मुळे गोव्यातील हवामान पालटले आहे. यामुळे गोव्यात उष्णतेमध्ये वाढ होणे, पावसाची कमतरता आदी दुष्परिणाम समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘राज्यात कूपनलिकांचा वापर करणार्यांनी पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. यासंबंधी जलस्रोत खाते लवकरच परिपत्रक काढणार आहे. राज्यातील भूजल पातळीवर परिणाम होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अजूनही पाऊस चालू झालेला नाही. हवामान खात्याने यंदा पाऊस अल्प पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. आताच आपण पाणी जपून न वापरल्यास पुढील वर्षी पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे.’’
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !