स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘ग्रंथाध्ययनाचा आपल्यावर खरोखर काय परिणाम झाला आहे ? याचा आपण शांतपणे विचार केल्यास आढळून येईल की, त्यामुळे फार तर आपल्या बुद्धीला खाद्य मिळून ती पुष्कळ तीक्ष्ण झालेली आहे; मात्र त्यामुळे आपल्या अंतरात्म्याचे काहीच साधले गेले नाही. आपल्यापैकी बहुतेक प्रत्येक जण आध्यात्मिक विषयांवर इतरांना थक्क करून सोडण्याइतपत अतीसुंदर बोलू शकत असला, तरी प्रत्यक्ष आचरणाच्या वेळी यथार्थ धार्मिक जीवन प्रत्यक्ष जगतांना आपल्या सर्वांची तिरपीट उडते; कारण ग्रंथांच्या वाचनाने आध्यात्मिक उन्नती साधत नसते. त्यासाठी ग्रंथाध्ययन अपुरे पडत असते. अंतरात्म्याच्या जागृतीसाठी दुसर्या एका आत्म्यापासून शक्ती यावयास हवी.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व
सुख-दुःख
गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक
आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !
सद्गुरूंविना परमार्थ साधता येत नाही !