
नवी देहली – अमेरिकास्थित एका आस्थापनाकडून मिळालेल्या परदेशी गुंतवणुकीत अनियमितता आढळल्याच्या प्रकरणी ‘न्यूजक्लिक’ या वृत्तसंकेतस्थळ आणि त्याचे संस्थापक-संपादक प्रबीर पूरकायस्थ यांच्या विरोधातील करवाई देहली उच्च न्यायालयाने रहित केली.
याविषयी न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा म्हणाल्या, ‘‘पूरकायस्थ यांच्यावरील कारवाई स्वतंत्र आणि निष्पक्ष पत्रकारितेवर सत्तेचा मनमानी वापर आहे. अन्वेषण यंत्रणा ठोस पुराव्यांविना व्यापक अन्वेषण करत राहिल्या. प्रथम दर्शनी अहवालात करण्यात आलेले आरोप खरे मानले, तरीही फसवणूक आणि विश्वासघात यांचा गुन्हा हा फौजदारी गुन्हा होत नाही. त्यामुळे प्रथम दर्शनी अहवाल चालू ठेवणे, हा कायद्याचा अपवापर आहे. कुणीही फसवणुकीची तक्रार केलेली नसतांना अन्वेषण यंत्रणांनी या प्रकरणाचे अन्वेषण चालूच ठेवले.’’
काय आहे प्रकरण ?
देहली पोलिसांनी वर्ष २०२० मध्ये परदेशी गुंतवणुकीत अनियमितता आढळल्याच्या प्रकरणी ‘न्यूजक्लिक’या वृत्तसंकेतस्थळाविरुद्ध प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला होता. त्यानंतर अंमलबाजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यां’तर्गत अन्वेषण करून विविध ठिकाणी धाडी घातल्या होत्या. यामध्ये ‘न्यूजक्लिक’ला काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर परदेशी निधी मिळाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात या वृत्तसंकेतस्थळावर परदेशी गुंतवणूक, कथित आर्थिक अपव्यवहार तसेच चीनशी संबंधित प्रचार, या आरोपांमुळे वाद निर्माण झाला होता. वर्ष २०२३ मध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड