ठाणे येथे वृद्धाला मारहाण; परप्रांतीय कह्यात !

उपमुख्यमंत्र्यांकडून हत्येच्या प्रयत्नांचा गुन्हा नोंदवण्याचे निर्देश !

घटनेच्या व्हायरल विडियो मधील दृश्य

ठाणे – येथील एका परप्रांतीय रिक्शाचालकाने एका वृद्धाला मारहाण केली. वृद्धाने त्याला रस्त्यात न थुंकण्याविषयी सांगितल्याने त्याला त्याचा राग आला होता; म्हणून त्याने वरील प्रकार केला. या वेळी त्याने वृद्धाला खालीही पाडले. यात वृद्ध घायाळ झाले आहेत. त्याने मारण्यासाठी दगडही हातात घेतला होता. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. या घटनेविषयी समजल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी संपक साधून संबंधित चालकावर कारवाई करण्याचे, तसेच हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

संपादकीय भूमिका

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच मारहाणीच्या घटनांना ऊत आला आहे ! सरकारने याविषयी कठोर धोरण अवलंबण्याची आवश्यकता आहे !