
पणजी, १० जून (वार्ता.) – भिकार्याला पैसे देणे हा गुन्हा आहे आणि याविषयी सर्वत्र जागृती केली पाहिजे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नोंदवले आहे. गोव्यातील भिकार्यांच्या समस्येवरून प्रविष्ट (दाखल) झालेल्या एका जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी गोवा खंडपिठाने हे निरीक्षण नोंदवले.
१० जून या दिवशी झालेल्या सुनावणीविषयी अधिक माहिती देतांना राज्याचे महाधिष्ठाता (ॲडव्होकेट जनरल) देवीदास पांगम म्हणाले, ‘‘गोवा सरकारने खंडपिठाच्या निदर्शनास आणून दिले की, गोव्यात भीक मागणारे भिकारी हे गोव्याबाहेरील आहेत. नाताळ आदी पर्यटन हंगामात गोव्यात भिकार्यांचे प्रमाण वाढते. गोवा खंडपिठाने भिकार्यांची समस्या सोडवण्यात साहाय्य करण्यासाठी या क्षेत्रात कार्य करणारी एखादी अशासकीय संस्था किंवा तज्ञ यांचे नाव सुचवण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.’’ गोवा एक समृद्ध राज्य आहे आणि या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. यामुळे पैशांसाठी भिकारी या ठिकाणी येतात आणि पर्यटन हंगाम झाल्यानंतर भिकारी त्यांच्या मूळ गावी जातात, असे निदर्शनास आल्याचे महाधिष्ठाता देवीदास पांगम यांनी पुढे सांगितले. गोवा खंडपिठाने या प्रकरणी पुढील सुनावणी २३ जून या दिवशी ठेवली आहे.
गोवा राज्य उघड्यावर शौचविधीमुक्त घोषित; मात्र निम्म्या पंचायतींकडून केवळ प्राथमिक पडताळणी पूर्ण
ठाणे येथे वृद्धाला मारहाण; परप्रांतीय कह्यात !
कोयना वीज प्रकल्प : पाण्याअभावी वीजनिर्मिती बंद
पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ५०० जणांविरुद्ध गुन्हा नोंद, २ धर्मांधांना अटक !
श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराला दीड किलो सोन्याचा कळस गोव्यातील भाविकाकडून दान
५ रुपयांच्या नोटांसह २० रुपयांची नाणी हे कायदेशीर चलन स्वीकारा ! – जिल्हाधिकारी