२३ सहस्र कोटी रुपयांच्या या प्रस्तावाला लवकरच संमत्ती मिळणार !

नवी देहली – भारतीय सैन्याची मारकक्षमता आणखी बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने ३०० हून अधिक ‘वज्र’ स्वयंचलित तोफांच्या खरेदीची प्रक्रिया चालू केली आहे. अनुमाने २३ सहस्र कोटी रुपयांच्या या प्रस्तावाला लवकरच संरक्षण खरेदी मंडळाची संमती मिळण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळातील तोफखान्यासाठीची ही सर्वांत मोठी खरेदी मानली जात आहे.
१५५ किलोमीटर क्षमतेच्या या तोफा लांब पल्ल्यापर्यंत अचूक मारा करण्यास सक्षम आहेत. विविध भूप्रदेशांमध्ये, तसेच कठीण हवामानातही प्रभावी कामगिरी करण्याची त्यांची क्षमता सिद्ध झाली आहे. त्यामुळे पश्चिम सीमेसह उत्तरेकडील संवेदनशील भागांत सैन्याची क्षमता वाढणार आहे. लांब पल्ल्याचा अचूक मारा, जलद हालचाल आणि रणांगणावरील तात्काळ प्रतिसाद, यामुळे नव्या तोफा सैन्याची सज्जता आणखी बळकट करतील, असा विश्वास संरक्षणक्षेत्रातील अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. वर्ष २०१७ मध्ये अनुमाने ४ सहस्र ५०० कोटी रुपये खर्चून १०० तोफांच्या पहिल्या तुकडीची मागणी करण्यात आली होती आणि वर्ष २०२१ मध्ये नियोजित वेळेआधीच त्यांचा पुरवठा पूर्ण झाला होता. या तोफांनी प्रभावी कामगिरी केली असल्याचे संरक्षण क्षेत्रातील तंज्ञाचे म्हणणे आहे.
उत्पादन देशातच होणार !
या तोफांचे उत्पादन देशातच केले जात असून त्यामधील स्वदेशी घटकांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नव्या खरेदीमुळे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेलाही चालना मिळणार आहे.
श्री राजमातंगी महायज्ञ आणि भारताच्या सुरक्षेसंबंधी अभूतपूर्व निर्णय यांचा परस्परसंबंध !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh